Reasons, why women are special! |(Marathi) #Blog 8

Reasons, why women are special!  |(Marathi)     #Blog 8

नमस्कार,

मी माझ्या पहिल्याच ब्लॉग मध्ये 'फेमिनीसम' विषयी थोडे व्यंग केले होते, परंतु त्यावरसुद्धा जरा मला सविस्तर बोलायचे आहेच, पण आज नको. 

आपण आजकाल बराच मुली किंवा स्त्रियांना/ पुरुष सुद्धा  "Respect women" किंवा "Ladies First" असे बोलताना बघितले असेल, पण याना माहित आहे का हो, कि का रिस्पेक्ट द्यावा? आणि खरंच द्यायला हवा का? चला जरा यावर discuss करूया. जरा सेन्सेटिव्ह विषय आहे पण यावर कोणीतरी तर बोलायला हवं!

Respect 

आपण रिस्पेक्ट (आदर) कोणाला देतो? ज्याची लायकी असते त्याला, बरोबर का? कि कोणालाही आपण रिस्पेक्ट देत सुटतो? नाही ना! (आपण भीती व स्वार्थ यामुळे देणारा रिस्पेक्ट वगळून टाकूया, कारण तो खोटा असतो)

आपला रिस्पेक्ट डिपेंड असतो तो व्यक्तीच्या कर्तृत्वावर, गुणांवर ! मग ती स्त्री असो किंवा पुरुष, कि फक्त स्त्रीलिंग आहे म्हणून रिस्पेक्ट द्यावे? (हे असे विचार आपण का करायला लागलो? तर हि आहे फेमिनिस्ट विचारधारा)    

स्त्री चे श्रेष्ठत्व 

आपण नेहमी बघितले असेल कि घरात स्त्री नसेल, तर ते घर नाही वाटत! आणि हे सत्य आहे. परंतु हे आज सुद्धा लागू होत का हो?

माँ दुर्गा 

पहिले स्त्री हि घर सांभाळत होती, आणि पुरुष बाहेरची कामे करून पैसे कमावत होता, आणि अशा प्रकारे हे बॅलन्स होत होते, घर व्यवस्थित असेल तर सर्व व्यवस्थित. मग सांगा सर्वात जास्त जबाबदरी कोणाची होती? ज्याप्रमाणे डिरेक्टर मूवी मध्ये दिसत नाही, परंतु सर्वात महत्वाचा रोल डिरेक्टरचाच असतो, त्याच प्रमाणे स्त्री चा रोल तेवढाच महत्वाचा. 


गृहिणी 
 स्त्री चे गुण आहेत माया, करुणा, प्रेम, लज्जा, सहनशक्ती, स्वयंपाक चांगला बनवणे, त्याग, आई होणे  इ. परंतु आता जग बदलले, आता पुरुषाबरोबर स्त्रिया सुद्धा बाहेर काम करू लागल्या पैसे कमावून घराला हात भार लावू लागल्या, बराच वेळेस आपणास असे दिसेल, कि स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक successful आहेत. आणि अशा successful स्त्रिया घर, आपली मुले सांभाळून आपले करिअर सुद्धा सांभाळत आहेत, आणि त्यांनी कधी रिस्पेक्ट ची डिमांड सुद्धा केली नाही, मग आहेत ना अशा स्त्रिया रिस्पेक्ट देण्या योग्य!  
आधुनिक गृहिणी 

परंतु अशा स्त्रियांचे क्रेडिट सरसकट सर्व स्त्रियांना मिळावे का हो?

कारण सीता मातेला जो आदर आपण देतो, तोच कैकयी ला देतो का? दोन्ही सुद्धा स्त्रियाच! (असे  बरेच उदाहरण इतिहासात व आपल्या आजूबाजूला आहेत) 

राम सीता 

कारण सीतेने केला होता त्याग! 

'एक राजकुमारी जिचे लग्न झाले एका राजकुमाराबरोबर,आणि जेव्हा ती राणी बनणार तेव्हा फक्त एका दुसऱ्या स्त्रीच्या स्वार्थामुळे सर्व काही चा त्याग करून, वनवासात काहीही न बोलता निघून गेली, तिला वाटले असते तर ती सुद्धा गेली असती आपल्या माहेरी!'

वनवासात निघताना 

याच प्रमाणे आज कालच्या स्त्रियांच्या  विचारांमध्ये जो काही बदल झाला आहे, तो सीतेप्रमाणे आहे कि कैकयी प्रमाणे? त्यागाची भावना सोडून, आपण स्वार्थाकडे तर वळत नाहीये ना?

स्त्री अशी शक्ती आहे जर तिने ठरवले, तर ती दोन्ही कुटुंबाचा उद्धार करू शकते, त्याच बरोबर नाश सुद्धा!

 आजच्या (बराच, त्यातल्या त्यात स्वतःला मॉडर्न समझणाऱ्या) स्त्रीयांचे विचार!

एकदा बहुतेक प्रियांका चोपडा बोललेली, कि मला पुरुषाची गरज फक्त मुलाला जन्म घालण्यासाठी आहे, नाहीतर मला कोणत्याही पुरुषाची गरज नाही. किती हे दयनीय विचार! मला तर हसायलाच आलेले.  

मान्य आहे आपण successful झालात, पण मग त्या successful होण्यात एकही पुरुष नव्हता? डिरेक्टर, ऍक्टर, शेफ, प्रोड्युसर, सिंगर हे नेमके सर्व पुरुषच होते, हे नसते तर आपले काय अस्तित्व? आम्ही पुरुषांपेक्षा कमी नाही हे सिद्ध करता करता, आजच्या स्त्रिया आपले स्त्रीत्व हरवत आहेत, आणि स्त्रीला आदर हे फक्त स्रीत्वामुळे मिळतो, आणि असे करता करता आपण स्त्रीरूपी पुरुषच झालो तर? कुठुन येणार रिस्पेक्ट? हा गोंधळ झाला पाश्चिमात्य संस्कृतीचा आंधळेपणाने अनुकरण केल्याने (मला इथे स्त्री पुरुष असे करायचे नाहीये, परंतु हे असेच आहे आता काय करावे?)



'मी स्वयं पूर्ण आहे मला कोणाचीही गरज नाही', 'मला स्वयंपाक येत नाही आणि मी शिकणारही नाही', 'मला घरात डस्टबिन (सासू सासरे किंवा म्हातारे लोक नको)', 'मी घरातल्या कामांना हात सुद्धा लावणार नाही', आणि यातल्या स्त्रिया बराच अशा असतात, कि ज्या काहीहि काम करत नाही, किंवा १०-१५ हजारांची जॉब करतात. काय करावे अशांचे? रिस्पेक्ट द्यावा कि नाही द्यावा?

 मी स्त्रियांनी कसे वागावे, काय करावे, यावर माझे काही मत नाहीये, कारण हि ज्याची त्याची पर्सनल चॉईस आहे, परंतु कोणाला रिस्पेक्ट द्यावा आणि कोणाला नाही हि सुद्धा आपली पर्सनल चॉईस नाही का?  

आता हे आपणच विचार करा, आणि ठरवा कि कोणती स्त्री रिस्पेक्ट देण्यायोग्य आहे, आणि कोणती नाही! कि सरसकट फक्त 'स्त्री' आहे म्हणून रिस्पेक्ट द्यावा? 

 धन्यवाद ! 

आपला एवढा अमूल्य वेळ देऊन तुम्ही माझा ब्लॉग वाचला, मला तुमच्या वेळेचे महत्व आहे!

यावर आपले विचार व सजेशन्स आपण कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता. 

अजून नवीन वाचण्यासाठी फॉलो करा (Think  about it !) 

 



टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट