Actually January is not the 1st month of year | (Marathi) # Blog 12

Actually January is not the 1st month of year | (Marathi)                                                                                               # Blog 12

नमस्कार,

आज कॅलेंडर नुसार नवीन वर्ष, जानेवारी चा पहिला दिवस मग काय वाटते खरंच खूप काही नवीन झाले का? कि फक्त एक कॅलेंडर बदलले, चला थोडा विचार करूया, बराच जणांना वाटेल आला हा नवीन वर्षाच्या दिवशी सुद्धा आला, कमीत कमी नवीन वर्ष तरी शांततेत जाऊ दे!  

असो, आपण नवीन वर्ष साजरा करतो, ३१ डिसेंबर  झाला.  सर्वांनी पार्टी वगैरे केली असेल, किंवा केक वगैरे कापला असेल, सर्वाना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या असतील. परंतु खरंच हे नवीन वर्ष आहे का? बाहेर वातावरणात किंवा आपल्या सूर्यमालेत काही बदल झालेला दिसतो काआपल्याला? कि जसा ३१ डिसेंबर होता तसाच एक नवीन दिवस उजाडला? 

जानेवारी ते डिसेंबर हे महिन्यांची नावे त्यातले शेवटचे सप्टेंबर ते डिसेंबर हे महिने लॅटिन शब्दातल्या आकड्यांवर आधारित जसे सेप्ट - सात , ऑक्ट- आठ , नोव्हा - नऊ , आणि डेका - दहा  असे यावरून त्यांची नावे पण सप्टेंबर हा तर नऊवा महिना , ऑक्टोबर हा दहावा, नोव्हेंबर हा अकरावा आणि डिसेंबर हा बारावा म्हणजे नावातच तफावत असे कसे झाले? आपण काय follow करत आहोत?

७१५–६७३ इ. स. पू.  'नुमा' ने रोमन कॅलेंडर बदलले (का बदलले? हि त्याची इच्छा) आणि त्यात मार्च च्या ऐवजी जानेवारी पासून सुरुवात केली, (Georgian कॅलेंडर नुसार फेब्रूवारी हा शेवटचा महिना होता म्हणून त्यात अपूर्ण दिवस आहेत) कारण जानेवारी हे नाव एका रोमन देवतेच्या (दरवाज्याची देवता जानूस ) हिच्या नावावर आधारीत आहे, आणि बाकीचे महिने सुद्धा कोणत्या ना कोणत्या रोमन देवतेवर आधारित आहे.  

तर बघा किती हि आपली दयनीय अवस्था आपण आपल्या देवतांच्या इतिहासाला ज्यांचे पुरातत्व पुरावे आणि अचूक वर्णन सिद्ध झालेले असून सुद्धा आपण त्याला myth म्हणून संबोधतो (कारण पश्चिमी मानत नाहीतं म्हणून) आणि कोणाला तरी वाटले आणि कोणत्यातरी राजाने करून ठेवले ते कितीही काल्पनिक असूनही आणि त्याला काही शास्त्रीय आधार नसेल तरी आपण ते आनंदाने स्वीकारतो, आता हा सांता कितीतीही काल्पनिक असला तरी आपण असे भासवायचा प्रयत्न करतो कि हे सत्य आहे, खरंच कोणी सांता येणार आणि गिफ्ट देऊन जाणार आणि आपणच स्वतः गिफ्ट ठेवतो, का करतो असे आपण? (कारण पश्चिमी मानतात म्हणून)

आपण एवढे आहारी गेलो आहोत कि पश्चिमी लोक आपल्यावर काहीही  थोपवतात आणि आपण त्याला एक  नवीन  STYLE  म्हणून स्वीकारतो. नाही स्वीकारले तर आपण किती जुन्या विचारांचे असे बोलून मोकळे.  मला मान्य आहे कि आपण स्वीकारलेही पाहिजे, पण जे आपल्या कडे नाही, किंवा जे आपल्याकडे आहे त्यापेक्षा उत्कृष्ट आहे ते.  कोणत्याही फालतू गोष्टी का स्वीकाराव्या?

मला सांगा किती लोकांना मराठी महिने एका रेषेत पाठ आहेत? त्यांचे महत्व माहित आहेत? ते महिने कसे सूर्याच्या बदलत्या कक्षेवर आधारित आहेत हे माहित आहे? उत्तरायण आणि दक्षिणायन हे आपल्याला आपल्या सणांमधून मिळते कि पश्चिमी सणांमधून? पश्चिमी सण  हे तर फक्त आकड्यांवर (तारखेवर) ठरलेले.  हा दिवस तो दिवस. पण त्यामागे काही शास्त्रीय करणे आहेत का? जे स्वतःला खूप शास्त्रीय समजतात तेच किती अशास्त्रीय आहेत. याचा आपण कधी विचार केला का? आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा असेच बनवत आहोत. 

आता जग याच कॅलेन्डर  वर चालते, मान्य आहे.  पण आपले काही अस्तित्व आहे कि नाही? नाही म्हटले तरी रोमन देवतांच्या नावावर आपल्याला महिन्यांची नावे  थोपवले गेले आहेत कि नाही? असे कितीतरी गोष्टी आहेत नाही का!  काळ हा फक्त BC आणि AC  (BEFORE CHRIST AND AFTER CHRIST) यामध्येच मोजला जातो. 

असे का? 

आपण यावर विचार करायला पाहिजे, कि आपण आपल्या नवीन पिढीला योग्य, सत्य आणि शास्त्रीय ज्ञानापासून वंचित तर ठेवत नाहीये ना?

मग करताय का नवीन वर्षाचा नवीन संकल्प!   ; )    


                                                                       धन्यवाद ! 

आपला एवढा अमूल्य वेळ देऊन तुम्ही माझा ब्लॉग वाचला, मला तुमच्या वेळेचे महत्व आहे!

यावर आपले विचार व सजेशन्स आपण कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता. 

अजून नवीन वाचण्यासाठी फॉलो करा (Think  about it !) 

 

 


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट