Food decoration! really necessary? | (Marathi) # Blog 11
अन्न सजविणे खरंच गरजेचे आहे? # Blog 11
नमस्कार,
बऱ्याच वेळेनंतर ब्लॉग लिहतोय, वेळ होता पण मूड नव्हता. कसंय आपण आपल्या काही गोष्टी मूड वर ठरवतो.
असो, आजचा ब्लॉग आपण डिसकस करणार आहोत अन्न सजावटीवर, याची आता एक वेगळी इंडस्ट्री च उभी राहिली आहे, आणि हॉटेल मानजमेंट चा भाग आहे. आता बराच लोकांना प्रश्न पडेल, याला काय त्रास असतो प्रत्येक गोष्टीचा, चांगले तर आहे.
हो चांगले आहे, पण विचार करायला काय हरकत आहे! ब्रिटिश पण तर फक्त व्यापाराच्याच हेतूने भारतात आले होते ना? ते पण तर चांगलेच होते, मस्त सूट बूट घालून! नाही का?
मागच्या एका ब्लॉग मध्ये मी लिहिले होते कि देखाव्यावर जास्त भर देणे हि पश्चिमी मानसिकता, त्यांना प्रत्येक गोष्ट अगदी नीटनेटकी आणि एकसमान हवी, बहुतेक त्यांना विविधता समजतच नाही! आता असे असणे वाईट नाही पण याचा अट्टाहास खूप वाईट!
काही उदाहरणांवरून बघूया पूर्वीच्या स्त्रियांचे ड्रेस कंबर लहान दिसावी म्हणून अगदी गच्चं कपडे घालावे लागत यामुळे स्त्रियांना श्वास घ्यायला सुद्दा त्रास होत होता, माणसे सूट आणि बूट सर्व सारखे दिसावे, घरे सुद्धा सारखी, अगदी देशाच्या सीमा देखील एकाच रेषेत, मग जेवणाची ताट अगदी व्यवस्थित सजवून, अन्नाला स्पर्श न करता खाण्याची पद्धत (अगदी कोणत्या हातात काटा चमचा धरावा आणि कोणत्या हातात चाकू याचे सुद्धा नियम) जेवताना हात भरवणे म्हणजे त्यांच्यासाठी मँनेरसलेस, परंतु हीच लोक टॉयलेट झाल्यावर tissue पेपर चा वापर करतात (सोफेस्टिकेशन वाटण्यासाठी मला टॉयलेट शब्द वापरावा लागला एवढे या लोकांचं आपल्या मनावर प्रभुत्व)
परंतु याच पलीकडे विविधता किंवा अस्ताव्यस्तता दिसल्यावर हि लोक गांगरून जातात, जसे कि भारतातली परिस्थिती.
एक साधे उदाहरण सांगतो आपल्या शरीराला जर नीट निरखून बघितले तर आपल्या शरीराचे अवयव भूमितीतील आकृत्यांप्रमाणे लयबद्ध नाहीत, अगदी २ पेशी सुद्धा वेगवेगळ्या आकाराच्या आहेत, परंतु शरीराचे काम अगदी अचूक पद्धतीने चालते. तसेच भारतात सुद्धा अनेक गोष्टी काही सिस्टिम नसताना अगदी सुरळीत चालतात, यासाठी मुंबई चे उदाहरण अगदी अचूक जुळते, एवढी विविध लोकसंख्या जर एकाच साच्यात बसवायचा प्रयत्न केला तर बसेल का ?
Chaotic India मग सर्व एकाच साच्यात बसवायचा प्रयत्न का? उदा आपली शिक्षण पद्धती हि पण पश्चिमेला अनुकरणाचा करणारी, म्हणजेच झाडावर चढण्याची शर्यत ठेवावी आणि त्यात हत्ती, माकड, सिंह, मासा, कासव, घोडा याना भाग घ्यायला सांगावा मग सांगा कोण जिंकणार? फक्त माकड, मग हे बाकीचे प्राणी निरर्थक आहे का हो? यांचे काही महत्व नाही का?
याच प्रमाणे फळे, अन्नाची ताट, केक, जूस हे कसे सजवावे ते शिकवले जाते, पण हे सुंदर कापलेले किंवा पक्ष्याचा आकारात कापलेले फळ आपण खातो का आणि खाल्ले तर त्यांचे गुण बदलले का ? आणि असे सजावट करताना किती अन्न वाया गेले? आता गरिबांची आठवण कोणाला येत नाही का? फक्त सुंदर दिसणे आणि सुंदर असणे यात काही फरक नाही का? जूस मध्ये लिंबू किंवा संत्र्याचा फक्त फ्लेवर पण त्याच ग्लास वर खरे लिंबू किंवा संत्र्याची फोड लावलेली, किती हास्यास्पद गोष्ट! किती हा दिखावे पणा!
Animal race
काही सजावटीचे पदार्थ हे खाण्यालायक पण नसतात, जसे कॉफी शॉप मध्ये त्या कॉफी वर बदामाचा आकार किंवा वेगवेगळ्या डिसाईन. मग सर्व पहिले त्याचा फोटो काढतात आणि मग ती कॉफी पितात , पोटात पण तीच डिसाईन राहिली का? आणि काय उपयोग झाला त्या डिसाईन चा? आपले खूप पैसे मात्र गेले आणि त्या कॉफीत ४ साखरेचे पाकीट टाकून सुद्धा ती गोड होत नाही (मी सुद्धा या गोष्टी अनुभवून बघितल्या आहेत). परंतु पिअर प्रेशर (इतर सर्व करतात म्हणून) म्हणा, किंवा आपल्याला देखावा करायचा आहे म्हणून म्हणा, आपण या गोष्टी करतो, पण साधे राहणे आणि साधे जेवण हे किती लाभकारी आहे याचा आपण विचार केला का? भूक लागली असेल तर ते जेवण सजवलेले नसेल तरी सुंदर वाटते आणि भूक नसेल तर कितीही सजवून त्या अन्नाचा काही उपयोग नाही.
Indian food on banana leaf |
बरेच आहे बोलण्यासारखे पण या वरून समझून घेण्यासाठी आपण सुज्ञ आहात.
Coffee with cream design मग आपण कधी बाहेर पडतोय या दिखाव्याच्या दुनियेतून?
धन्यवाद !
आपला एवढा अमूल्य वेळ देऊन तुम्ही माझा ब्लॉग वाचला, मला तुमच्या वेळेचे महत्व आहे!
यावर आपले विचार व सजेशन्स आपण कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता.
अजून नवीन वाचण्यासाठी फॉलो करा (Think about it !)
खरे आहे तुमचे म्हणणे.👍👍
उत्तर द्याहटवा