Is it really necessary to have a PET? | (Marathi) #Blog 7
PET (पाळीव प्राणी) असणे खरंच गरजेचे आहे ? #Blog 7
नमस्कार,
मी काल facebook, whatsapp अशा सोसिअल मीडिया वर ब्लॉग लिहिला, आणि मनात एका कोपऱ्यात असे वाटले कि, आपण नेगेटिव्ह ब्लॉग्स लिहितोय का? कारण काही जण म्हणतील ,कि याला प्रत्येक गोष्टीत वाईटच दिसते, चांगले नाही. पण आमच्या मेडिकल field मध्ये असे सांगितले आहे कि,औषधाचे तुम्हाला इफेक्ट माहित नसले तरी चालेल, पण side इफेक्ट नक्की माहित असायला हवे.
जवळ जवळ सर्वच जण आधुनिक जगातल्या गोष्टी करतच आहेत, आणि आपण त्यांना counter करणाऱ्या गोष्टी सांगत आहे, म्हणजेच, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोलत आहोत. पण नंतर विचार केला मेजॉरिटी जे करते ते बरोबरच असेल, असे काही नाही. कारण या देखावाच्या दुनियेत सत्याचा मार्ग नेहमीच रिकामा आहे, आणि त्यावर competition पण फार कमी आहे, बरोबर ना!
चला तर मग अजून एक थोडा वेगळा आणि काही लोकांसाठी खूपच सेन्सेटिव्ह टॉपिक वर डिस्कशन करूया.
PET
म्हणजेच पाळीव प्राणी, जे पाळण्या योग्य असतात. भारतात गाय, बैल, म्हैस असे प्राणी पाळले जातात, जे शेतात काम करण्यासाठी, दूध मिळवण्यासाठी उपयोगी येतात, आणि त्यांना आपल्या घरातल्या एका सदस्यप्रमाणे वागणूक व काळजी घेतली जाते. कारण हे प्राणीच घराचे भरणं पोषण करतात. परंतु आधुनिकतेच्या नावाखाली वेस्टर्न लोकांचे अनुकरण करणारे कित्तेक लोक आपणास आपल्या आजूबाजूला दिसतील, परंतु त्या मागचे कारण काय? हे जाणून न घेता फक्त ते (गोरे) लोक करतात ना, मग आपण पण करायचं. आणि किती forward आहोत याचा आव आणायचा, किती हि दयनीय अवस्था (मानसिक गुलामी)!
डॉग वेस्टर्न लोक PET का पाळतात?
एकतर त्यांची संस्कृती, जीवन जगण्याची पद्धती आपल्यापेक्षा अतिशय भिन्न आहे.
वेस्टर्न देशामध्ये एक तर लोकसंख्या खूप कमी, म्हणजे रस्त्यावर गर्दी कधी दिसणार नाही (काही ठराविक शहर सोडली तर ) आणि एकत्र कुटुंब पद्धती त्या ठिकाणी नाही, म्हणजेच मुलगा १८ वर्षाचा झाला कि त्याने त्याचे बघून घ्यावे, त्यात अजून डिवोर्स चे प्रमाण जास्त , कधी कधी मुलाला आई किंवा वडील यामध्ये निवडावे लागते,(आणि आपण हळूहळू अशा गोष्टींचे अनुकरण करत आहे , अनुकरण चांगल्या गोष्टींचे करायला पाहिजे नाही का?)
मग वरील या गोष्टींचं परिणाम म्हणजे मानसिक आधार नसणे, एकटे पणा वाटणे, आपल्यावर कोणी प्रेम करत नाही, काळजी करत नाही या भावनेने डिप्रेशन येणे, तर मग हि जी भावनिक पोकळी, आहे ती भरून काढण्यासाठी ते PET पाळायला सुरुवात करतात, आणि ते हि असे pet जे कि cross question विचारत नाही, आपल्यावर प्रेम करते आणि आपण सांगणार तसे ऐकते म्हणून डॉग हे पेट म्हणून जास्त लोकप्रिय आहे आहे का??? काय माहित!!! (ऐक प्रकारचा इगो satisfy करण्यासाठी, बरोबर का? कारण जर पेट आपली मनमानी करायला लागला, तर असे pet कोण पाळेल?
परंतु आपली अशी परिस्थिती आहे का?
याउलट आपल्या कडे अति काळजी करणारे आपले घरचे, भरपूर लोकसंख्या (एकटे बसावे म्हटले तरी कोणीतरी येऊन बोलेलच), घरात माणसांना राहायला जागा नाही आणि इकडे पेट साठी स्पेशल रूम, त्यांचे खाणे वेगळे, पेट क्लीनिकस आणि त्यांचे रेगुलर चेक उप , त्याच्या maintenance वरचा हजारो रुपयांचा खर्च, (पण इकडे रस्त्यावर कोणी खायला मागितले तर त्याला एक बिस्किटाचा पूडा सुद्दा देणार नाही,) त्याला मॉर्निंग वॉक ला सकाळी घेऊन जा (असं कोणी सकाळी लवकर उठायला सांगितले तर उठणार नाही) आणि घरात खाऊ घातलेले ते, तो बाहेर काढणार, आणि अशी बाहेर घाण केल्यानंतर कोण करेल ते स्वछ? परंतु घाण दिसल्यावर Disgusting म्हणणारे हेच लोक, त्यांनीच तर जास्त घाण पसरवलेली असते.
ते कुत्र्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिफिसिअल breed, आपल्याला हवे तसे बाहुल्यांसारखे बनवायचे त्यांना, त्यामुळे मला विचार येतो, खरंच तुम्ही त्या कुत्र्यावर प्रेम करतात का? कि स्वतःच्या आवडीवर! विविध Breed चे नाव माहित असणे म्हणजे एक अभिमनाची बाब वाटते आपल्याला, एवढेच जर मूक प्राण्यावर प्रेम आहे ना, मग रस्त्यावरचे कुत्रे पाळा! त्यांची काळजी घ्या, ते पण तर प्राणीच आहेत ना? ते हि प्रेम करतील तुमच्यावर! हे आर्टिफिसिअल breed केलेलें का? असे हजारो रुपये खर्च करून, एका जिवंत प्राणी फक्त विरंगुळा किंवा फक्त खेळणे म्हणून विकत घेणे हे किती योग्य?
लहान मुलांवर याचा काय परिणाम होतो?
डॉग ब्रीड्स
आज काल, ते पण टीव्ही, social media मध्ये बघूनच! मुलांच्या वाढदिवसाला एक पेट देण्याचे फॅड वाढत आहे, बिचारे लहान मुले निरागस असतात, ते त्या नवीन आलेल्या पेट ला खूप जीव लावतात, खेळतात, परंतु आपण एवढे सुज्ञ शिकलेले असून आपल्याला हे माहित नाही का? pet ची life cycle (१०-१३ वर्षे) आणि मनुष्याची life cycle (८०-१०० वर्षे) भिन्न आहे! पेट लवकर लवकर मोठा होणार आणि नक्कीच आपल्या आगोदर मारणार, मग ते दगावल्यानंतर, आपल्या जीवनातला एखादा व्यक्ती दगावला प्रमाणे दुःख होते त्यांना, यामुळे मुलांमध्ये येते डिप्रेशन, इमोशनल इम्बॅलन्स, मग कितीतरी दिवस ते मूल त्या pet जाण्याच्या "गम" मध्ये राहणार, आणि पेरेंट्स मनावणार किंवा परत नवीन पेट आणून देणार !
का गरज नसताना आपण आपले आणि बिचाऱ्या मूक प्राण्यांचे life कॉम्प्लिकेट करतो आहोत? फक्त आपला विरंगुळा म्हणून कि एक social status म्हणून? जर आपल्याकडे भरपूर पैसा आणि वेळ आहे तर या जगात करण्यासारखी बरीच कामे आहेत!
गरज नसलेल्या 'कृत्रिम गरजांना' बळी पडून, आपण ऐक खूप मोठी बाजारपेठ निर्माण केली आहे, नाही का?
जरा विचार करा!
धन्यवाद !
आपला एवढा अमूल्य वेळ देऊन तुम्ही माझा ब्लॉग वाचला, मला तुमच्या वेळेचे महत्व आहे!
यावर आपले विचार व सजेशन्स आपण कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता.
अजून नवीन वाचण्यासाठी फॉलो करा (Think about it !)
आजकाल लोक कुत्रा यासाठी पाळत असतात ,की फेसबूक,इन्स्टाग्रामवर व्हाट्स ऍप वर तेवढाच दिखावा करता येईल की आम्ही किती श्रीमंत आहोत पण मला तरी अश्या लोकांची खरंच कीव येते कारण हे लोकं फक्त दिखाव्यासाठी जगतात. खरे जीवन जगणे तर यांना माहीतच नसते. खूप छान ब्लॉग डॉक्टर साहेब👍0
उत्तर द्याहटवा