How Facts and theories impacts our life? | (Marathi) #Blog 10
तथ्य (शाश्वत सत्य) आणि सिद्धांतांचा आपल्या जीवनावर प्रभाव! #Blog 10
नमस्कार,आजचा विषय थोडा समझायला जड पडू शकतो, परंतु तो तेवढाच महत्वाचा आणि विचार करण्यासारखा आहे.आपल्या जीवनावर विचारांवर आणि वागण्यावर यांचेच संपूर्ण वर्चस्व आहे. तर चला बघूया नेमकं मला काय म्हणायचं आहे ते.सर्वात आगोदर आपण facts (म्हणजेच तथ्य, खरे तर मला शाश्वत सत्य हाच शब्द वापरायला आवडेल) आणि theories यांमधला फरक समझून घेऊया.
Facts (शाश्वत सत्य/ तथ्य)-म्हणजेच जे सत्य आहे, कधीही न बदलणारे म्हणजेच आपण काय विचार करतो, आपण काय मानतो, काय मनात नाही, याने त्यावर कवडीचाही फरक पडत नाही. तर मग असे कोणते सत्य आहेत? काही उदाहरणांवरून समझून घेऊ या.१. सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो.२. गुरुत्वाकर्षण (न्यूटन ने शोध लावला असता, किंवा नसता ते पूर्वी पण काम करत होते, आणि पुढे पण करत राहणार)३. दिवसानंतर रात्र.४. पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे.हे समझण्यास सोपे आणि सर्वमान्य असल्यामुळे हि उदाहरणे दिले, असे प्रत्येक क्षणाला आपल्या आजूबाजूला बरीच उदाहरणे आहेत परंतु theories आपल्या मनावर बिंबवल्यामुळे ते बघणे आपणास अशक्य आहे.आता मला ऐक गोष्ट सांगा या गोष्टींमध्ये कधी आपल्याला कधी 'अपवाद' आढळला का हो? म्हणजेच वर्षातून एकदा सूर्य पश्चिमेकडून उगवतो किंवा पृथ्वी फिरणे बंद करते? ..... नाही ना?
Theories (सिद्धांत)-म्हणजेच कोणीतरी काहीतरी सिद्ध करतो (आपल्या पद्धतीने आपल्याला हवे तसे वातावरण निर्माण करून) आणि theories च्या स्वरूपात मांडतो.परंतु हे सत्य आहे असे नाही. कारण कोणी तरी याच सिद्धांताला चुकीचे सिद्ध केले, तर ते चुकीचे ठरते. परंतु एवढे दिवस आपण त्याच सिद्धांताला सत्य मानून चालतो, मग तेवढ्या दिवसांचं काय? एक छोटा किस्सा सांगतो:मी शाळेत असताना आम्ही सूर्य मालिकेतील ग्रहांची नाव पाठ केलेली त्यात 'प्लूटो' हा ग्रह होता, मग एके दिवशी माझ्या मावशीची छोटी मुलगी तिचे भूगोलाचे पुस्तक वाचत होती, असेच जुन्या आठवणी म्हणून मी ते पुस्तक बघू म्हटलं, तर मी त्यात बघितले कि, त्यातून प्लूटो हा ग्रहच सूर्य मालिकेतून वगळून टाकला होता, म्हटलं हे असे कसे झाले? एवढे वर्ष तर मी तेच गृहीत धरून चालत होतो! (काही म्हणतील update राहत जा! पण सत्य हे update नाही होत ते जसे आहे तसेच असते) पण तो ग्रह त्याच जागेवर आहे, आपण कोण त्याला वगळणारे आणि ऍड करणारे? आता समजा जर मी त्या छोट्या मुलीबरोबर वाद घातला, कि मी तर प्लूटो आहे असेच शिकलो आणि ती म्हणाली असती कि नाही पुस्तकात तर असं दिलंय (मग त्यामागचे कारण काहीही असो). मग मला सांगा कोण बरोबर, ती कि मी ? मग असेच वाद आपले होत आहेत का?
काही उदाहरणे बघू-१. light is a particle - प्रकाश हे बारीक बारीक कण आहेत असेच न्यूटन ने सांगितले, नंतर बरच वर्षांनी असे सिद्ध केले कि light हे wave आहे.२. डार्विन theory of evolution - जर माकड पासून मनुष्य डेव्हलोप झाला, तर माकड माकड का राहिला?३. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो (हे चुकीचे सिद्ध केल्यामुळे गॅलिलिओ ला मृत्युदंड देण्यात आले होते)४. पृथ्वी चपटी आहे
5. law of attraction theory (सध्या तरुण पिढीत याची खूप क्रेझ आहे कारण मार्केटटींग छान केली आहे!)
आता मला सांगा किती हि तफावत! सत्य आणि theories मध्ये? आणि अशा अनंत theoris वर आज आपण अवलंबून आहोत. आणि या theories मुले आपली सत्य कडे बघण्याची शक्ती कमी कमी होत आहे, असे नाही का वाटत?मग खरंच विचार करा आपले जीवन एक सत्य वर आधारित आहे कि चुकीच्या theories वर!फॅक्ट आणि थेअरी फरक कसा ओळखावा?अगदी सोप्प आहे ज्या गोष्टींना 'अपवाद' आहेत त्या theories (अपवाद हा शब्द टाकून theories मांडणारे मोकळे होतात) परंतु जे अपवाद आहे त्याचे काय?आणि सत्य हे सर्वांवर सामान लागू होते प्रत्येक क्षणी प्रत्येकावर, 'अपवाद रहित'.जसे आपल्या वेदांमध्ये, शास्त्रांमध्ये आणि गीतेमध्ये एवढ्या हजारो वर्षांपूर्वी जे शाश्वत सत्य ज्ञान दिले आहे, जे कि आजही आपल्या आयुष्यात तेवढ्याच अचूकतेने लागू होते, मग तो भारतीय असो किंवा कोणत्या दुसऱ्या देशाचा, तो हिंदू धर्म मानणारा असो, किंवा न मानणारा या गोष्टींनी काहीही फरक पडत नाही, कारण ते शाश्वत आहे. आपल्याला समझत नाही किंवा आपल्याला माहित नाही किंवा आपण ते मानत नाही, याचा त्या सत्य सोबत काही एक संबंध नाही, ते तेवढ्याच अचूकतेने लागू होते.जसे काही लोक सूर्याची पूजा करतात, तर काही नाही. याचा अर्थ असा नाही कि सूर्य जे पूजा करत नाही यावर कमी प्रकाश टाकतो!असो,आता मी एक मेडिकल profession शी संबंधित असल्यामुळे आणि मेडिकल profession हे सर्वांशी संबंधित असल्यामुळे त्यावर थोडे बोलतो.आयुर्वेद सुद्धा एक शाश्वत शास्त्र आहे म्हणून त्यात दिलेल्या सिद्धांतांमध्ये कधीही बदल झाला नाही, आणि होणार नाही कारण ते शाश्वत सत्यांवर आधारित आहे आणि ते अजूनही प्रत्येकावर तसेच लागू होतात. तुम्ही मान्य करा अथवा नका करू.
वात, पित्त, आणि कफ हे मूळ दोष यावर शरीराची प्रकृती अवलंबून असते, यांच्या गुणांनुसार शरीरात बदल घडतात व्याधी निर्माण होतात, परंतु शास्त्रात यांच्याविषयी चे जे काही गुण आणि कर्म सांगितले आहेत त्यात आज पर्यंत घट आणि वाढ नाही झाली ते अजूनही तसेच लागू होतात, आपला त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो परंतु त्यांच्या कार्य पद्धतीत काही फरक पडत नाही.आधुनिक शास्त्रातील theory मांडणाऱ्यांच्या शरीरात सुद्धा याच सिद्धान्तांनी कार्य होत आहे मग ते मान्य करू देत अथवा नको.एकदा छोटेसे उदाहरण देतो आणि संपवतो, कारण मला फक्त हा विषय प्रकाश झोतात आणायचा होता, बोलायला गेलो तर ऐक ग्रंथ तयार होईल, नाही का?" ज्वर असेल तर लंघन करावे असे चरकाचार्यांनी सांगितले आहे'(लंघन म्हणजे काहीही न खाणे/ उपवास) तर यावर एका जपानी संशाधकाने बराच लोकांवर प्रयोग करून तेच सिद्ध केले जे ग्रंथात हजारो वर्षांपूर्वी सांगितले आहे आणि नोबेल prize मिळवला. (हं ! आता आपण मान्य करणार! नाही का?) पण हे नोबेल चरकांना मिळायला पाहिजे, नाही का?परंतु मला सांगा, अशा किती theories आहेत ज्या रोज बदलतायेत, ज्यात अनेक अपवाद आहेत, आणि काही तर सपशेल चुकीच्या ठरतायेत, आणि आपण यांवर विश्वास ठेऊन जगतोय! जर science हे सत्या वर आधारित आहे मग ते शास्त्रातील या शाश्वत गोष्टींपेक्षा या theories वर का ऐवढा विश्वास ठेवतो? जे सत्य आहे त्याला prove करण्याचं काय गरज? मग आपल्याला जे काही या theories च्या माध्यमांमधून ज्ञान मिळते ते किती खरे आहे? मग आपले विचार हे theories मुळे सत्यापासून दूर तर नाही ना जात? कि आपल्याला जाणून बुजून सत्यापासून वंचित ठेवले जात आहे?
जरा विचार करा! आणि सत्य आणि थेअरीस मधला फरक समझून घ्या, theories ह्या शाश्वत सत्य नाही आणि theories वर आधारित सिद्ध केलेले सिद्धांत तेवढेच असत्य.
धन्यवाद !
आपला एवढा अमूल्य वेळ देऊन तुम्ही माझा ब्लॉग वाचला, मला तुमच्या वेळेचे महत्व आहे!
यावर आपले विचार व सजेशन्स आपण कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता.
अजून नवीन वाचण्यासाठी फॉलो करा (Think about it !)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
if any suggestion let me know