Is Facebook, You tube & whatsapp really 'FREE'? | (Marathi) # Blog 6
Facebook, You tube आणि whatsapp हे खरोखर फ्री आहे का? # Blog 6
नमस्कार,
ब्लॉग चे title वाचल्यानंतर काही जण जिज्ञासेने वाचतील, तर काहींना कारण पहिलेच माहित असेल आणि काही म्हणतील याला काय करायचे आहे , मिळतंय ना फ्री, मग वापरून घ्या ना? उगाच कशाला झोपलेल्याना जागी करावं!
तर असो, आपला ब्लॉग हा काहीतरी वेगळ्या दृष्टीने विचार करण्यास भाग पडणारा, आणि नवीन काही गोष्टी (ज्या मला माहित आहेत) त्या share करण्यासाठी आहे.
तर आपल्याला एवढे तर माहीतच आहे कि या जगात 'फ्री' काहीही नाही, प्रत्येक गोष्टीची काहीतरी किंमत असते, अगदी मंदिरात मिळणार प्रसाद सुद्धा, कारण त्याला बनवण्यासाठी सुद्धा कोणीतरी किंमत मोजलीच आहे ना!
facebook logo
तर, आता facebook विषयी जाणून घेऊया,
फ्री डाउनलोड करा आणि फ्री वापरा, एकही रुपया लागत नाही फक्त इंटरनेट तेवढं लागतं, तरी बराच जणांच्या मनात हा प्रश्न आलाच असेल कि एवढं सर्व फ्री देऊन सुद्धा मार्क झुकेरबर्ग एवढा श्रीमंत कस काय झाला?
नेहमी लक्षात ठेवा, आजच्या बाजारानुसार जेव्हा वस्तू फ्री मिळत आहे तर समझा विकले तुम्ही जात आहात. (म्हणजेच तुम्हाला विकून पैसे कमावले जात आहेत).
कसे काय?
तर आता फेसबुक आहे सोसिअल मीडिया प्लॅटफॉर्म (हा शब्द महत्वाचा), यात जगातले लोक एकमेकांसोबत संवाद घालू शकतात, विविध गोष्टी share करू शकतात, याचे अनेको फायदे परंतु त्याची किंमत तुम्ही स्वतः ला विकून चुकवत आहात .
बरेच जण म्हणतील अरे बाबा आम्ही विकले कसे गेलो? आम्ही तर आमच्याच घरी आहे आणि स्वतंत्र आहे! तर बहुतेक अशा लोकांना थोडा विचार करायची गरज आहे.
जेव्हा आपण अकाउंट creat करतो तेव्हा त्यात आपली संपूर्ण माहिती भरावी लागते (काही म्हणतील आम्ही fake माहिती भरतो) तरीही त्यानंतर आपल्याला काही नोटिफिकेशन्स येतात ज्या आपल्याला Allow कराव्याच लागतात त्यातल्या काहींचा त्या सोबत संबंध असतो तर काहींचा नाही. आणि एकदा कि तुम्ही ऍक्टिव्ह झाले तर तुमच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात होते. मग तुम्ही काय शेअर करता, तुमच्या आवडी निवडी (त्यात असत ना your hobbies, favorite movies etc.) मग तुम्ही काय like करतात, कशावर किती वेळ घालवताय या वरून कन्फर्म होते, मग तुमचा वापर ऍड दाखवण्यासाठी, नंतर politically influence करण्यासाठी केला जातो. तुमच्या पूर्ण विचारांवर हळू हळू तुमच्या न कळत ते नियंत्रण करायला सुरुवात करतात. आणि तुम्ही नको असलेल्या गोष्टींच्या मागे धावायला सुरुवात करतात.
एक उदाहरणावरून सांगतो- तुम्ही नेहमीच बघितला असेल कि एखादी पोस्ट येते, त्यात lamborghini कार ,किंवा सूट बूट चष्मा घालून एक तरुण त्या कार सोबत , किंवा apple कंपनीचे gadgets ठेवलेले आणि खाली लिहिलेले असते this is success किंवा work till you get this. आता मला सांगा सर्व successful लोक असे असतात का? हि success ची डेफिनेशन कोणी ठरवली? आणि आपली युवा पिढी असे निरर्थक स्वप्न मनात घेऊन आटापिटा करते, आणि खरंच कोण successful झालं तर त्याला असा देखावा करण्याची गरज पडते का हो? जर भारतात कोणी lamborgini कार घेऊन फिरला तर १-२ किमी अंतरावरच ती एखाद्या स्पीडब्रेकर वर see -saw खेळताना दिसेल नाही का ! हे फक्त एक उदाहरण झाले.
Location -
मला आलेला एका अनुभवावरून सांगतो, मी माझ्या मित्रांसोबत असेच शॉप्स मध्ये हिंडत होतो आणि माझ्या एका मित्राला shoes घ्यायचे होते, मग आम्ही एका ब्रँडेड शॉप मध्ये गेलो, नंतर घरी आल्यावर मी बघतो तर मला वेग वेगळ्या shoes च्या ऍड माझ्या मोबाइलला वर दिसू लागल्या, मी shoes on line search केलेले नसून सुद्धा, मी अचंबित झालो कि याना कसे समझले कि मी बुटांच्या दुकानात गेलो होतो ते? तर ते आपल्या लोकेशन वरून! जरी तुमचे लोकेशन बंद आहे, परंतु फोन तर चालू आहे ना ! तेवढेच खूप आहे.
तुम्हाला आठवत असेलच कि मार्क झुकेरबर्ग वर facebook हे addictive असल्याचे आरोप लागले होते. आता तुम्हीच विचार करा कि खरंच facebook हे addictive आहे कि नाही?
बर ठीक आहे फेसबुक ऍड दाखवून पैसे कमावतो पण वॉट्सअप वर तर काही ऍड पण नाही येत. बरोबर ना?
तर मग इथे आपण पूर्ण पणे विकले जातो. आपले लोकेशन्स, चॅट्स, आपली संपूर्ण माहिती मिळते आणि यावर तुम्ही fake अकाउंट पण नाही create करू शकत ना, तुमचा मोबाइलला नंबर जो फेसबुक वर compulsory नव्हता, मग हे जे काही lacunas आहेत आपल्या माहिती मिळवण्याचे, ते अशा विविध apps द्वारे मिळवले जाते, शेवटी ते एकाच ठिकाणी जमा होणार ना! आता तुमचे फोटोस कसे मिळवावे? मग त्या साठी instagram आहे ना!
whatsapp logo
instagram logo
यावर उपाय?
हे जाळे एवढे घट्ट विणले गेले आहे कि त्यातून बाहेर येणे एवढे सहज शक्य नाही, आणि एका व्यक्तीकडून तर बिलकुलच नाही, नाहीतर तो बाजूला एका कोपऱ्यात पडल्यासारखा दिसेल. आणि हे फक्त एक साधन नसून, तर गरज होऊन गेले आहे, आपण योग्य मार्गाने आणि स्वतः वर सय्यम ठेऊन, बाहेरील गोष्टीचा स्वतःवर influence न होऊ देता, खरंच आपल्या हिताचा विचार करून आपण यांचा वापर केला पाहिजे, आता बघा ना मला हे सर्व तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी तर याच साधनांचा वापर करावा लागत आहे ना! किती हि आपली मजबुरी, मग जे स्वतः ला स्वतंत्र समझत होते, ते नोटिफिकेशन ची बेल वाजली कि धावतात ना लगेच मोबाइल कडे? किंवा नाही वाजली तरी १० वेळेस उघडून बघतात ना मोबाईल, कि कोणी massege बघितला, कोणी रिप्लाय केला? काही तर एवढे व्यसनाधीन झालेत कि स्टेटस ठेवण्यासाठी काहीतरी event शोधतात किंवा जबरदस्ती creat करतात आणि त्यावर वायफळ खर्च! (कोणी म्हणेल हे आमची मर्जी- तर यासाठी मी #ब्लॉग २ लिहिला आहेच, इच्छा आपली कि दुसऱ्यांची? एकदा वाचून बघा!)
मग तुम्हीच सांगा, आहेत का फेसबुक, whatsapp फ्री? आणि आहेत का आपण खरोखर स्वतंत्र?
धन्यवाद !
आपला एवढा अमूल्य वेळ देऊन तुम्ही माझा ब्लॉग वाचला, मला तुमच्या वेळेचे महत्व आहे!
यावर आपले विचार व सजेशन्स आपण कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता.
अजून नवीन वाचण्यासाठी फॉलो करा (Think about it !)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
if any suggestion let me know