Our Rights and Responsibilities | (Marathi) #Blog 4
Our Rights and Responsibilities | (Marathi) #Blog 4
नमस्कार,
आज आपण जरा आपल्या अधिकारांविषयी discuss करूया, आजकालच्या पिढीला "माझे अधिकार" म्हणजेच "मुझे हक है" ची रट लावताना तुम्ही नेहमीच बघितलं असेल आणि टीव्ही, social media किंवा बातम्या या मध्ये सुद्धा या अधिकारांना खूप हवा दिली जाते. आणि शेवटी कोणाचा तरी "so called" हक्क मारताना आपल्याला सुद्धा भीती वाटू लागते आणि यातून निर्माण होतात complications.
शाळेत मुलांना शिक्षा देता येणार नाही (मारता येणार नाही)- म्हणजेच मुलांचा मार न खाण्याचा हक्क! नाही का? किती हास्यास्पद गोष्ट आहे, आम्ही तर लहान पानापासून हेच शिकत आलो होतो कि, "छडी लगे छम छम , विद्या येई घाम घम " पण आता छडीच नाही, आणि आता मुलांना कसलाही धाक नाही, आणि उलट शिक्षकांना मुलाच्या पालकांची भीती , आमच्या मुलाला आम्ही स्वतः कधी हात उचलला नाही आणि तुम्ही कोन त्याला मारणारे ? असे बोलून लगेच पोलीस केस करतात (माझा शिक्षेच्या नावाखाली छळ करणे याला नक्कीच विरोध आहे) पण आपण या वागण्याने मुलगा /मुलगी यांच्या मनात काय भाव निर्माण करत आहोत याचा कधी विचार केला का?
तर चला बघूया आपल्या अधिकारांसाठी नेमकी काय एलिजिबिलिटी आहे ते...
बहुतेक आपण सर्व जण बँक वापरतच असणार, त्यात काही लोक डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड सुद्धा वापरत असणार. समजा आपल्याला काही कारणांसाठी कर्जाची गरज पडते तर आपण बँकेकडे अर्ज करतो कि मला या या कामासाठी एवढे एवढे कर्ज हवे आहे, आणि बँक तूमचे व्यवहार, बँक बॅलन्स, पगार, तुमचे कर्ज भरण्याचे potential, सिबिल स्कोर या गोष्टींचा विचार करून मग तुम्ही कर्ज घेण्यासाठी eligible आहात कि नाही हे ठरवते आणि त्यात सुद्धा बरेच अटी व नियम लागू करून .बरोबर का?
![]() |
| पैसा |
कि असे होते कि तुम्ही बँकेत जाता आणि बँक मॅनेजर जवळ जाऊन सांगता , माझे तुमच्या बँकेत खाते आहे तर तुम्ही मला जेवढे पाहिजे तेवढे कर्ज द्यायलाच पाहिजे?
नाही होत ना असे ?
उलट कोणी असे केले तर तो हास्याचे पात्र ठरेल आणि आपणच हसू त्याच्यावर.
मग अधिकारांच्या बाबतीत पण असेच आहे ना! हे का नाही समझून घेत आपण? अधिकार त्यालाच मिळायला हवे ज्याने एलिजिबिलिटी क्रिटेरिया पूर्ण केला असेल simple!
आता बँक अटी नियम लावते ते आपल्याला चालते उलट आपण त्याला standard प्रोटोकॉल म्हणतो. परंतु अधिकारांसाठी आपल्याला एलिजिबिलिटी पूर्ण करायची नाहीये बरोबर ना?
बँक
पण मग एलिजिबिलिटी कशी पूर्ण करावी?
नक्कीच आपले कर्तव्य पूर्ण करून, आपल्याला अधिकार कोणी दिले या महान देशाच्या संविधानाने तसेच याच संविधानाने या देशाच्या नागरिकांची कर्तव्य सुद्धा ठरवून दिली आहेत परंतु सर्व माझे अधिकार काय काय आहेत हेच google search करता परंतु कोणी कर्तव्य search करत नाही, हीच तर परिस्थिती आहे .
संविधान
माझा एक मित्र (software Engineer) आहे आणि आम्ही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये बराच दिवसांनी गावाकडे भेटलो, गप्पा मारल्या, तो काही महिन्यांपूर्वीच US ला जाऊन आला होता, थंडी पडली होती त्यामुळे बहुतेक त्याला सर्दी, खोकला झाला होता, त्यात आमचे डिस्कशन वळले standard of living वर ,
"अरे मला तिकडेच settle व्हायचे आहे, तिकडे माणसाच्या जीवनाला खूप किंमत आहे, स्वच्छता आहे , सर्व सुख सुविधा आहे, भारताचं काहीच नाही होऊ शकत रे." तो म्हणाला, तेवढ्यात त्याला खोकला आला आणि तो रस्त्यावर थुंकला.
आणि आमचे डिस्कशन पुढे चालू राहिले कि भारताचे कसे काही नाही होऊ शकत यावर.
शेवटी मी त्याला विचारलं कि, "तू US मध्ये होता तेव्हा सुद्धा असेच रस्त्यावर थुंकत होतास?"
तो म्हणाला नाही, तिकडे Fine लागतो.
मग मला सांगा, आपलीच लोक बाहेरच्या देशात जाऊन नियम पाळतात रस्त्यावर थुंकत नाही स्वछता ठेवतात पण भारतात येऊन रस्त्यावर थुंकतात कारण एवढे स्वातंत्र्य फक्त भारतातच! तरीही काही लोकांना आजादी पाहिजे ...अजून किती पाहिजे आजादी? ......थोडे विषयांतर झाले.
असो. परंतु अशा लोकांना भारतात स्वछता नाही असे बोलण्याचा काय अधिकार? कारण अस्वच्छता पसरवणारी लोक हीच ना!
हे फक्त एक उदाहरण असे बरेच उदाहरणे आहेत.
२६ नोव्हेबर या दिवशी आपल्या सरकार ने संविधान दिवस साजरा करायचा ठरवलं आणि प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यक्रमांद्वारे भारतीय नागरिकांचे कर्तव्य हा विषय सुद्धा सर्वांच्या समोर आणून दिला हि खरंच एक चांगली गोष्ट वाटली
आपली संविधानात दिलेली कर्तव्ये :
१. संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.२. भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे.३. देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे.४. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वगीर्य भेदांपलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे.५. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे६. वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसगिर्क पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, प्राणिमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे.७. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे.८. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे.९. राष्ट्र सतत, उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे.१०. माता-पित्याने किंवा पालकाने सहा ते चौदा वर्षांदरम्यानचे आपले अपत्य किंवा यथास्थिती, पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे.
हि आपली कर्तव्ये आणि मग यानंतर येतात अधिकार ...
किती लोकांना माहित होती आपली कर्तव्ये? आणि नसतील तर मग आपल्याला आपल्या अधिकारांवर खरंच अधिकार आहे का? जरा विचार करा.धन्यवाद !आपला एवढा अमूल्य वेळ देऊन तुम्ही माझा ब्लॉग वाचला, मला तुमच्या वेळेचे महत्व आहे!
यावर आपले विचार व सजेशन्स आपण कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता.
अजून नवीन वाचण्यासाठी फॉलो करा (Think about it !)








सुंदर लिखाण व विचार आहे.
उत्तर द्याहटवा