We are in control of others! | (Marathi) #Blog 2
We are in control of others! | (Marathi) #Blog 2
नमस्कार मित्र मैत्रिणींनो ,
आज आपण 'आपल्या इच्छा या आपल्याच आहेत कि कुणी दुसर्याने आपल्या मनात भरल्या ' यावर जरा discussion करूया .
आपल्याला हे माहित आहे कि प्रकृती मध्ये भगवंताच्या इच्छेशिवाय एक पत्ता सुद्धा हालत नाही. मग जर असे असेल तर मग हे संपूर्ण जीवन तर एक scripted story प्रमाणे भासू लागते. मग जे काही होत आहे ते तर भगवंताच्या इच्छे प्रमाणे होत आहे आपल्याला तर काही करायचीच गरज नाही, बरोबर का?
परंतु आपण जर भगवद्गीतेचा रेफरेन्स घेतला तर जेव्हा अर्जुन आपल्या नातेवाईकांसोबत युद्ध करण्यास नकार देतो, हत्यार टाकून देतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनावर ताबा करून त्यांच्या इच्छेप्रमाणे जे त्यांना हवे ते घडवू शकले असते, परंतु तसे तर काही झाले नाही. मग नेमके काय झाले?
जर आपण नीट विचार केला तर आपल्याला हे जाणवेल कि आपल्या इच्छाच आपले जीवन घडवतात मग ते चांगले असो किंवा वाईट. भगवंताने एकाच गोष्टीवर आपले पूर्णपणे नियंत्रण दिले आहे आणि ती म्हणजे आपली 'इच्छा'.
युद्ध करण्याची अर्जुनाची इच्छा नव्हती , परंतु श्रीकृष्णाने अर्जुनाचे हात धरून बाण नाही चालवले. पण अर्जुनाला 'गीता' या स्वरूपात ज्ञान देऊन अर्जुनाला clarity दिली आणि मग अर्जुनाने आपल्या इच्छेने आपला युद्ध धर्म पाळला.
बरं आता तुम्ही म्हणाल हे झालं अर्जुनाचं आपलं काय? तो अर्जुन होता इथे आपल्याला तर मार्ग दाखवायला श्रीकृष्ण नाही. बरोबर ना!
हीच तर महत्वाची गोष्ट आहे, समजा आता कोणीतरी तुमच्या न कळत तुमच्या इच्छांवर नियंत्रण करू लागले तर? आणि तुम्हाला वाटणाऱ्या 'माझ्या' इच्छा या तुमच्या स्वतःच्या नसून त्या तुमच्या मनात ऍड झाल्या असतील तर?
चला एका उदाहरणावरून मी समझवायचा प्रयत्न करतो:
मी माझ्या वर्गात lecture घेत होतो, आणि मी एका स्टुडन्ट (final year graduation) ला प्रश्न विचारण्यासाठी उठवले, तेव्हा मला तिच्या हातावर एक टॅटू दिसले. सहजच मी विचारले हे काय आहे? तिने थोडा हात लपवत सांगितले टॅटू आहे सर.
बर का काढले? मी विचारले.
माझी इच्छा होती केव्हापासून म्हणून मी ते काढले, ती म्हणाली.
बर आता वरच्या या संवादावरून आपणास काय वाटते हि तिची स्वतःची इच्छा होती कि ती तिच्या मनात भरली गेली होती . विचार करा ! (माझा टॅटू काढण्याला विरोध नाही तसेच समर्थनही नाही.)
जे टॅटू तिने काढले नक्कीच तसे तिने कोणाच्या तरी हातावर बघितले एकतर तिची कोणी मैत्रीण किंवा कोणी सेलिब्रटी. आणि त्यातून निर्माण झाली इच्छा आणि जर तिने तसे टॅटू बघितलेच नसते तर?
हे झाले एक छोटे उदाहरण परंतु अशा वॉट्सअप स्टेटस बघून, movies बघून, adds बघून निर्माण होणाऱ्या आर्टीफिशीअल इच्छांमुळे आपल्या जीवनात काही विपरीत परिणाम तर होत नाही ना ? या गोष्टींचा आपण नक्कीच विचार करायला हवा.
इच्छा नक्की असाव्या परंतु त्या आपल्या स्वतःच्या आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या असाव्या.
आहे का मग तुमचे तुमच्या इच्छांवर लक्ष?
धन्यवाद !
आपला एवढा अमूल्य वेळ देऊन तुम्ही माझा ब्लॉग वाचला, मला तुमच्या वेळेचे महत्व आहे!
यावर आपले विचार व सजेशन्स आपण कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता.
अजून नवीन वाचण्यासाठी फॉलो करा (Think about it !)
खरंच मॉडर्न ज्ञान (माहिती) विश्वासार्ह आहे ? #Blog 1




actually it is right... we need to think before taking any decision or stepping further. This blog actually force me to think......
उत्तर द्याहटवा