Right methods to DRINK WATER! | (MARATHI) #BLOG 3

Right methods to DRINK WATER!   | (MARATHI)       #BLOG 3                                                

नमस्कार,

 आपला विषय आहे पाणी किती  प्यावे?

आता पाणी किती प्यावे हे सुद्धा आपल्याला सांगावे लागते म्हणजे आपण जास्त ऍडव्हान्स होता होता बेसिक गोष्टीच विसरून गेलो असे नाही का वाटत? असा कोणता प्राणी आहे कि ज्याला सांगावे लागते कि पाणी किती प्यावे आणि जेवण काय करावे आणि किती करावे? जरा विचार करा!

प्रत्येक प्राण्याला माहितिये कि काय खावे आणि काय खाऊ नये , काय प्यावे आणि काय पिऊ नये. तहान लागली नसेल तर गाई समोर कितीही पाणी आणून ठेवलं तरी ती पिणार नाही.  आणि आपण स्वतःला एवढे ऍडव्हान्स समझतो आणि आपल्या या जीवनावश्यक गोष्टींविषयी माहित नाही? किती दयनीय अवस्था झालीये आपली. आणि आपण research  करतोय यावरसुद्धा ! ते हि वेळ आणि पैसे खर्च करून हि जास्त दयनीय अवस्था आहे असे नाही का वाटत ? पण असे का झाले? पूर्वीपासून आपण असेच आहोत का?

तर नाही.

आपले शरीर खूप advanced तंत्रज्ञानाने बनले आहे, त्यावर आपले बाह्य शोध काही उपयोगाचे नाही ते आधीही अगदी अचूक काम करत होते व आताही करतंय. उलट आपण आपल्या विचित्र प्रयोगांनी त्याच्या कामात बाधा आणतो आणि स्वतःच दुष्परिणाम भोगतो. असो 

तर पाणी किती प्यावे याचे उत्तर कित्ती सोपे आहे, जेव्हा तहान लागते तेव्हा एक एक घोट असे करून  पाणी प्यावे आणि तहान लागली नसेल तर पिउ  नये simple यावर कशाला हवीये research? बॉडी डिमांड करतेच जी गोष्ट हवी त्याची, उदा. हिवाळ्यात उष्ण गोष्टी आल्हाद दायक वाटतात (कारण शरीरात उष्णता कमी झालेली असते) तर याच उलट उन्हाळ्यात थंड आल्हाद दायक वाटते  (कारण शरीरात उष्णता वाढलेली असते). हे झाले एक उदाहरण असे बरेच आहेत यावर तुम्हीच विचार करा.  

परंतु अपूर्ण ज्ञानेंद्रियांनी केलेला research चा मधेच लेख येतो, खूप पाणी प्या दिवसातून ५ लिटर पाणी प्यालेच पाहिजे त्वचा तुकतुकीत होते, आणि बाहेरून आलेल्या सर्व गोष्टींना आपल्या डोक्यावर घेऊन नाचणारी लोक ५ काय ६ लिटर पाणी प्यायला सुरुवात करतात, ते पण जबरदस्ती, विविध ब्रँड च्या  विविध रंगाच्या bottles घेऊन तहान लागलेली नसताना! त्यात पण देखावा, पण मग काय उपयोग ? त्याचे दुष्परिणाम तर होणारच. 

पाणी हे जीवन असलं तरी त्याचे दुष्परिणाम नाहीत असे कोणी सांगितले? 

"अति सर्वत्र वर्जयेत" कोणत्याही गोष्टीची अधिक मात्रा हि दुष्परिणाम कारकच  ठरते.

वाग्भटांनी कोणत्या आजारात किती पाणी प्यावे आणि जेवताना कसे पाणी प्यावे हे सांगितले आहे. 

आता वाग्भट कोण?  आपल्याला Stephen hawking माहित आहे पण वाग्भट नाही?  जाऊ द्या  (असं समजा पूर्वीचे scientist)



   "नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमलपाग्निगुल्मीभि :।

पाण्डुदरतिसारार्शोग्रहणीशोषशोथीभी: । ऋते  शरणनिदाघाभ्यां पिबेत्सव स्थ :आपि  चाल्पश: ।।" 

                                                                                                               - अ . हृ. ५/१३

सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर  आपल्या शक्ती पेक्षा (पचन शक्तीपेक्षा) कोणीही जास्त पाणी नाही प्यायला पाहिजे. 

" सम स्थूल कृशा  भुक्त मध्यान्त प्रथमाम्बुपा:।।" अ . हृ . ५

जेवताना मध्ये मध्ये थोडे पाणी प्यायल्याने शरीर सम रहाते, जेवणाच्या शेवटी पाणी प्यायल्याने शरीर स्थूल (जाड) होते, आणि जेवणाच्या आगोदरच पाणी प्यायल्याने शरीर कृश (दुर्बल)  होते. 

तर मग वाचल्या नंतर काय जाणवले? आपण बरोबर पद्धतीने पाणी पीत होतो कि चुकीच्या? काय वाटते? 

 'इच्छा' आपली कि दुसऱ्यांची ?        #Blog 2 

धन्यवाद ! 

आपला एवढा अमूल्य वेळ देऊन तुम्ही माझा ब्लॉग वाचला, मला तुमच्या वेळेचे महत्व आहे!

यावर आपले विचार व सजेशन्स आपण कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता. 

अजून नवीन वाचण्यासाठी फॉलो करा (Think  about it !) 

 


           

    टिप्पण्या

    लोकप्रिय पोस्ट