5 things we don't need, but producers earns huge money! | (Marathi) #Blog 9

 ५ गोष्टी ज्यांची आपल्याला गरज नाही, परंतु ते खूप पैसे कमावतात!  #Blog 9

नमस्कार,

आज आपण अशा ५ गोष्टी पाहणार आहोत ज्यांची आपल्या आयुष्यात थोडीसुद्धा गरज नाही, किंवा त्यावाचून आपले काहीही अडत नाही, परंतु तरीसुद्धा आपण ती विकत घेतो, आणि त्यामुळे त्यांचे खूप मोठे मार्केट आहे आणि त्या कंपन्या खूप पैसे कमावत आहेत.

चला तर मग जाणून घेऊया कोणत्या त्या गोष्टी. 

१. कोल्ड ड्रिंक्स -

 

आपण नेहमी जाहिरात बघतो 'डर  के आगे  जीत है'  किंवा 'हिरो पहाडावरून किंवा विमानातून उड्या मारतो फक्त एका कोल्ड ड्रिंक च्या बाटली साठी, (दुकानात मिळते रे बाबा विकत घेऊन टाक!), काही जाहिरातीत असे दाखवले जाते कि, हे जे पितात ते किती कूल, यंग आणि डायनॅमिक असतात, मग ती जाहिरात ५०-५५ वर्षाचा हिरो करत असतो तरी. 

परंतु  खऱ्या आयुष्यात असे  होते का हो? उन्हाळ्यात सुद्धा अशा कोल्ड ड्रिंक्स मुले आपली तहान भागवली जाते का? "बापरे! मला खूप  तहान लागली आहे, एक कोल्ड ड्रिंक द्या", आपण असे म्हणतो कि,  एक पाण्याचीच बॉटल विकत घेतो? विचार करा!

काही कोल्डड्रिंक्स फ्लेवर्ड  मिक्स असतात, त्यात फळाचा एक अंश सुद्धा नसतो (त्या बॉटल वर तसे लिहिलेले सुद्धा असते ( added flavour म्हणून), मग नेमका या कोल्ड ड्रिंक्स चा उपयोग काय? तर काहीच नाही!


मला माझ्या मित्रासोबतचा एक किस्सा आठवतो, त्याला खूप कोल्ड्रिंगस पिण्याची घाण सवय लागली होती, कायम तो बाहेरून रूम वर आला, कि त्याच्यासोबत एक-अर्धा लिटर थम्स उप ची बॉटल आणत होता, आणि पित होता.  हे अति होताना दिसल्यानंतर सर्व जण त्याला बोलले कि, अरे हे चांगलं नाही, काहींनी शुगर जास्त असते म्हणून सांगितले, मग त्याने Diet Coke प्यायला सुरुवात केली! किती हसण्यासारखी गोष्ट आहे, अरे बाबा पिऊच नको ना, त्यात कसली आले डाएट?

हे का होतं ? कारण स्ट्रॉंग मार्केटिंग! ते आपल्या मनावर हे बिंबवायला यशस्वी झाले कि, गरज आणि उपयोग नसताना सुद्धा हे का प्यावे, आणि unhealthy असूनही आम्ही तुमच्या health ची किती काळजी घेतो, हे दाखवायला ! खरे पहिले तर त्यांना तुमच्या health ची कवडीचीही चिंता नाही, चिंता आहे तर त्यांच्या बिसनेस ची! 

२. जंक फूड-

त्याचे नावच 'जंक फूड' आहे, जंक म्हणजेच "कचरा" आणि आपण ते खातो. मग यात काय काय येते? तर बरेच काही  उदा. पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ़्राईस जे आपण विकत घेतो  दुकानांमधून, जर हेच घरी बनवले तर ते एवढे हानिकारक नाही, यापेक्षा भारतीय वडापाव, समोसा, कचोरी ज्यांना spicy व oily म्हणून unhealthy सांगतात ते त्या जंक पेक्षा अधिक healthy!

कारण जे  दुकानात मिळते दिसायला सुंदर व त्यात अमाप preservatives आणि अजून असे काही chemicals टाकलेले असतात, त्यामुळे तुम्हाला ते पुन्हा खाण्याची इच्छा होणार! आणि या preservatives मुले हे अन्न  वर्षांनुवर्षे खराबसुद्धा होत नाही! 

मग काय वाटत खरंच आहे का आपल्याला याची गरज!

३.   Tattoo 


पूर्वी भारतात हातावर काही लोक ज्यांना लिहिता वाचता येत नाही, असे लोक आपले स्वतःचे नाव गोंदून घेत होते, जेणेकरून आपली आयडेंटिटी सांगता येईल, परंतु आता आपली काय मजबुरी झाली कि आपल्याला असे करावे लागते? आणि शरीरावर का? त्यामागची कारणे अगदी विचित्र कि, जसे कि माझी जवळच्या व्यक्तीची आठवण म्हणून, किंवा प्रेम किंवा माझ्यासाठी इ. आणि बरेच काही!  अरे हो! पण ते गोंदण्याची गरज काय? जर आपल्यासाठी आहे तर ते जगाला दाखवायची गरज काय? आणि गोंदले तरच आठवण राहणार का? बराच वेळेस तर असे होते कि एका प्रेमिकेचे नाव गोंदायचे आणि ब्रेकअप झाला कि रेमूव्ह करायला जायचे! किती मूर्खपणा आणि हास्यास्पद!  

 मग काय वाटत खरंच आहे का आपल्याला याची गरज!

४. Cigarettes- 

ज्यांना याची सवय झाली आहे, मी त्यांच्याविषयी काही करू शकत नाही, परंतु  ज्यांनी cigarette घेतलीच  नाही त्यांचे कधी काही अडले का?

उलट पैसे वाचले , पर्यावरण प्रदूषण वाचले, आजूबाजूच्या लोकांचे health  वाचली. पर्यावरण प्रदूषणाची एवढे मोठं मोठे बाता करतात, तर यावरही काही उपाय करायला पाहिजे कि नाही?

जे पितात ते म्हणतील कि आम्ही आमच्या पैशांची पितो, नक्कीच प्या! परंतु तो धूर बाहेर सोडू नका, आतच राहू द्या  ! कारण आम्हाला त्रास नको. नाही का! 

 मग काय वाटत खरंच आहे का आपल्याला याची गरज!

५. Sports car 

या गाड्या दिसायला सुंदर, पण खरंच यांचा काही उपयोग आहे का? कोण ३००-४०० च्या स्पीड ने गाडी चालवत? रस्ते तसे आहेत का? आणि असले तरी ते प्रॅक्टिकल आहे का? एवढ्या स्पीड वर accident  झाला तर काय होणार? पेट्रोल डिझेल च काय? एकी कडे म्हणतात कि नैसर्गिक संसाधने कमी झालेत आणि या गाड्या २-३ चा average देतात. आणि त्यात फक्त २ किंवा काहींमध्ये फक्त १ व्यक्ती बसू शकतो.  

मग काय वाटत खरंच आहे का आपल्याला याची गरज! 

काहींना वाटत असेल कि अंगूर खट्टे! परंतु हे अंगूर आहेत का? काहीतरी तर उपयोग पाहिजे? मग आपण विचार करू घेण्याचा नाही का! 

आपण जर नीट निरीक्षण केलं, तर आपल्याला एक जाणवेल कि यातली एकही गोष्ट भारतीय नाही, सर्व पाश्चात्य! मग यावर नक्कीच विचार करायला हवा नाही का? कि आपल्याला कोण, आणि किती मूर्ख बनवत  आहे ते ?

अजून बरेच गोष्टी आहेत, जर तुम्हाला अजून यापेक्षा काही वेगळ्या गोष्टी आठवत असतील, तर कृपया कंमेंट मध्ये लिहून मला कळवा . 

  धन्यवाद ! 

आपला एवढा अमूल्य वेळ देऊन तुम्ही माझा ब्लॉग वाचला, मला तुमच्या वेळेचे महत्व आहे!

यावर आपले विचार व सजेशन्स आपण कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता. 

अजून नवीन वाचण्यासाठी फॉलो करा (Think  about it !) 

 




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

if any suggestion let me know

लोकप्रिय पोस्ट